Dhyas Vande Mataramcha – ध्यास वन्दे मातरमचा [ एका राष्ट्रीय गीताच्या शोधाचा अद्भुत प्रवास ]

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (6 November 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 160 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 8199355751
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-8199355750
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 125 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1.2 x 21 cm
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

200.00230.00

Compare

राष्ट्रभक्तीने भारलेले असंख्य असतात; पण वेदमंत्राइतकेच वंदनीय असणारे ‘वन्दे मातरम्’ हे आपले राष्ट्रीय स्तोत्र, राष्ट्रीय गीत! या गीताच्या जन्माला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सुमंगल लेणे लाभले असताना, या परमपवित्र राष्ट्रीय गीताचा, जन्मस्थळाचा व त्याभोवती असलेल्या काहीशा निगूढ पदरांचा वेध घ्यावासा वाटणे, हे संवेदनच विलक्षण दुर्मीळ आहे.
अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या बंकिमचंद्रांच्या छोटेखानी चरित्र पुस्तकातून ‘वन्दे मातरम्’ या मंत्राशी मिलिंद सबनीस यांचे भावोत्कट नाते जुळले. भले हे छोटेखानी पुस्तक असेल, पण त्यामुळे एका अद्भुत यात्रेसाठी मनाने पाऊल पुढे निघण्यासाठी ते आतुर झाले. पुढे मग निमित्ते कशी येत गेली आणि ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समग्र संदर्भाने शोध घेण्याचे पिसे लेखकाला कसे जडले, याचा प्रवास लेखकाने या पुस्तकात उलगडला आहे.
ही ध्यासयात्रा केवळ ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या जन्मस्थानाभोवती वा त्यातून प्रसरणाऱ्या मंत्रवत प्रार्थनालहरीपर्यंत न राहता, पुढे नव्या पिढीत हा राष्ट्रीय विचार रुजावा म्हणून त्यांनी अथकपणे जिवाचे जे रान केले, त्या घटनांचेही दर्शन या पुस्तकातून घडते.
प्रवीण दवणे
(ज्येष्ठ साहित्य)

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dhyas Vande Mataramcha – ध्यास वन्दे मातरमचा [ एका राष्ट्रीय गीताच्या शोधाचा अद्भुत प्रवास ]”