IASची पाऊलवाट-भारतीय प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास
तुम्हाला IAS व्हायचंय? तुम्ही UPSCची तयारी करत आहात?
तर तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहजे!
कारण IASच्या पाऊलवाटेवर हे पुस्तक तुमचे बोट धरून तुमची सोबत करणार आहे.
UPSCच्या पूर्व व मुख्य परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, उपयुक्त संदर्भ साहित्य आणि अभ्यासाची दिशा याचे नेमके मार्गदर्शन हे पुस्तक करत आहे. अभ्यासाविषयी अतिशय महत्त्वाच्या व परिणामकारक टिप्स या पुस्तकातून तुम्हाला मिळणार आहेत.
IASच्या वाटेवरील कठीण आव्हान म्हणजे मुलाखत – व्यक्तिमत्त्व चाचणी! या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीचा यशस्वी मंत्र देणारे हे पुस्तक आहे. त्याचबरोबर तुमच्यात एक सकारात्मक आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम हे पुस्तक नक्कीच करेल.
श्री. संकेत भोंडवे यांच्या स्वानुभवावर आधारित हे पुस्तक तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते; कारण श्री. संकेत भोंडवे स्वतः IAS अधिकारी असून, ते या सर्व प्रक्रियेतून गेलेले आहेत. प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास, राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व त्यासाठी प्राप्त झालेले राष्ट्रीय व राज्य पुरस्कार अशी श्री. भोंडवे यांची ही यशोगाथा तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल IAS होण्याच्या प्रवासात हे पुस्तक तुम्हाला दिशादर्शक ठरेल.
©️ 2021 Sanket Shantaram Bhondve IAS











Be the first to review “IASची पाऊलवाट : भारतीय प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास”
You must be logged in to post a review.