Jallianwala Bagh 13 April 1919 – जालियनवाला बाग

Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (1 January 2023)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 240 pages
ISBN-13 ‏ : ‎ 978-9395481144
Country of Origin ‏ : ‎ India

238.00340.00

१३ एप्रिल १९१९. बैसाखीचा पंजाबी नववर्षाचा दिवस. ब्रिगेडियर जनरल डायर ५० रायफलधारी शिपायांसह चिंचोळ्या प्रवेशद्वारातून जालियनवाला बागेत शिरला. समोर मैदानात सुरू असलेल्या सत्याग्रही सभेतील निःशस्त्र, निरपराध समुदायाकडे निर्देश करून, त्याला कोणतीही सूचना न देता, बचावाची कुठलीच संधी न देता त्याने आदेश दिला, ‘फायर sss

आणि लष्करी कौशल्याने रायफली धडधडल्या… शेकडो

लोकांचे प्राण गेले.

अमृतसरमधील या निर्दयी घटनेमुळे वसाहतवादी इंग्रजांचा दमनकारी चेहरा उघड झाला. त्यांच्या सभ्यतेची लक्तरं जगात टांगली गेली. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा ट्रिगर पॉइंट ठरली! भारतातील इंग्रज राजवटीच्या अखेरीची ही सुरुवात ठरली…..

महात्मा गांधी म्हणाले, ‘प्लासीच्या लढाईने ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला, अमृतसर घटनेने त्याला हादरा दिला!” जुलूम, अत्याचाराची ही कहाणी, जी भारतीय स्वातंत्र्याची चेतना बनली.

श्री. मनोहर सोनवणे हे लेखक, कवी, पत्रकार - संपादक अशा विविध भूमिकांमध्ये चार दशकांपासून सक्रिय आहेत. त्यांनी संपादनक्षेत्रात भरीव कार्य केले आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे या संस्थेचे ते विद्यमान संपादक आहेत. 'एक शहर सुनसान' (कवितासंग्रह), 'सदरा बदललेली माणसं' (ललितगद्य) याशिवाय 'लोकशाही झिंदाबाद' (ऑक्सफर्ड प्रेसच्या 'The Story of Democracy in South Asia' या अभ्यासग्रंथाचा अनुवाद), 'शोध नेहरूंचा व भारताचाही' (श्री. शशी थरूर लिखित 'Nehru The Invention of India' या पुस्तकाचा अनुवाद), 'बियॉन्ड 2020' (डॉ. अब्दुल कलाम यांच्या ग्रंथाचा अनुवाद), 'वर्तमानात वर्धमान' (अनुवाद) आदी ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. त्यांच्या साहित्यिक, तसेच संपादकीय कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.
Weight .215 kg
Dimensions 14 × 1.8 × 21 in

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jallianwala Bagh 13 April 1919 – जालियनवाला बाग”