मथित
लेखिकेच्या भावविभोर स्पंदनांचा टिपलेला लेखनक्षण म्हणजे ‘मथित’ हे पुस्तक. दैनंदिन आयुष्य जगताना ‘माणूस’ म्हणून अनेक पातळ्यांवर, अनेक प्रसंगात्मक अशा प्रकारचे अनुभव लेखिकेने शब्दबद्ध केले आहेत. त्यात अपर्णा महाजन यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या अनुभवांपासून ते वैचारिक, प्रवासवर्णनात्मक असे सर्व प्रकारचे अनुभवविश्व त्यांनी साकारले आहे. जरी अनुभवविश्व या लेखनातून साकारले, तरीही त्या लेखनाला चिंतनात्मक असा गहिरा धागा आहे. निखळ वाचनानंद देण्यासोबतच अंतर्मुख करणारे असे हे लेखन आहे. लेखिकेच्या अनेकपदरी अनुभवांच्या पार्श्वभूमीवर अभिव्यक्त झालेल्या ‘स्वत:च्या’ अशा विचारांचे हे ‘मथित’ आहे.
Be the first to review “मथित”
You must be logged in to post a review.