<h3>स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी</h3>
मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती म्हणून रॉनी स्क्रूवाला हे महत्त्वाचं नाव! “स्वप्नं पहा…उघड्या डोळ्यांनी!” या आपल्या पुस्तकात त्यांनी आपल्या अनुभवांची शिदोरी उलगडली आहे. रॉनी स्क्रूवाला हे यूटीव्हीचे संस्थापक असून ते पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. दोन दशकांहून अधिक काळात त्यांनी काही यशस्वी (आणि काही अयशस्वी) व्यवसायांची उभारणी केली आहे. या पुस्तकात या क्षेत्रांतील वेगाने बदलत असलेल्या घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. उद्याच्या भारतात असलेल्या उद्योजकतेच्या ठोस भूमिकेचं ते समर्थ करतात. जर तुमच्याकडे व्यवसायाची एखादी अद्भुत कल्पना असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तुम्हाला स्वत:च्या मालकीचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पावलं उचलली असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
जर तुम्ही व्यवसाय सुरू करून एका टप्प्यापर्यंत आला असाल आणि आता कंपनीचा विस्तार, ब्रँडिंग आणि मूल्यनिर्मिती अशा गोष्टींविषयी निर्णय करत असाल तर हे पुस्तक पुढे पुढे वाचत जा… जर तुम्ही तुमची सुरक्षित नोकरी सोडून आपल्या मनातल्या व्यवसायाच्या स्वप्नामागे धावण्याचा विचार करत असाल तर हे पुस्तक वाचा. तुमचे स्वप्न घरच्यांना सांगितले तर ते नक्की घाबरतील असे वाटत असेल तर हे पुस्तक त्यांना वाचायला द्या. जर तुम्ही अनुभवी व्यावसायिक असाल आणि आपल्या व्यवसायाची पुढची भरारी मारण्याच्या तयारीत असाल तर हे पुस्तक वाचा. तुम्ही ज्या कंपनीत काम करता आहात तिथे प्रभावी लीडर म्हणून काम करण्याची तुमची जिद्द असेल तर हे पुस्तक वाचा.
मला खात्री आहे, की हे पुस्तक तुम्हाला यशासाठी प्रेरणा देईल, तुमच्या अपयशाची योग्य जाणीव करून देईल, तुमची महत्त्वाकांक्षा वाढवेल आणि अधिक मोठा विचार करायला भाग पाडेल.
स्वप्नं पहा…उघड्या डोळ्यांनी! हे पुस्तक यश-अपयश, उद्योजकाची विचारधारा आणि त्याचे अनुभव यांचे स्पष्ट शैलीत वर्णन करते. त्यामुळे वाचकांचे आतले डोळे उघडतात. अगदी हत्ती विरुद्ध मुंगी इतक्या टोकाच्या संकटातही परिस्थितीशी दोन हात कसे करायचे आणि आपले स्वप्न विझू द्यायचे नाही ही प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. जगातील प्रसन्न, सकारात्मक व आशावादी लोकच हे जग घडवू शकतात. अशा सळसळत्या, ऊर्जासंपन्न आणि तळमळीच्या लोकांच्या साहाय्याने या देशांतील उद्योजकतेच्या प्रचंड क्षमतेचा आपण वेध घेऊ शकतो.
हे पुस्तक हे शक्य आहे या मानसिकतेचे आहे. मी हे केलं हे सांगणारे हे पुस्तक नाही. सगळे काही शक्य आहे. फक्त स्वप्नं पहा. जेव्हा स्वप्नं पहाल तेव्हा ते स्वत:च्या उघड्या डोळ्यांनी पहा.
श्री. रॉनी स्क्रूवाला यांनी उद्योजकता या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित
स्वप्नं पहा…उघड्या डोळ्यांनी हे पुस्तक लिहिल्याचे समजल्यावर मला
खूपच आनंद झाला आहे. पुस्तकामुळे भारतातील तरुणांना आपल्या स्वप्नांचा वेध घेण्यास प्रेरणा मिळेल आणि भारतातील लाखो लोकांच्या आयुष्यांची उभारणी करण्यासाठी ते अधिक चांगल्या नावीन्यपूर्ण पद्धती शोधून काढतील, अशी मी आशा करतो. या प्रसंगी मी श्री. रॉनी स्क्रूवाला यांना माझ्या सदिच्छा देतो आणि त्यांच्या प्रयत्नांपासून अनेकांना स्फूर्ती मिळेल अशी आशाही व्यक्त करतो.
– श्री. नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान
English Descrption
In Dream With Your Eyes Open, first-generation entrepreneur and UTV-founder Ronnie Screwvala details his vast experiences and the myriad lessons learnt from more than two decades of building some successful (and some not-so-successful) businesses, bringing clarity to a quickly changing business landscape and making an impassioned case for the role of entrepreneurship in India’s future. If you’ve ever had an impactful, disruptive product or business idea, been curious about owning your own business, or have already taken the first steps on your entrepreneurial journey, this is the book for you. If you’ve been running your own company for the last seven-odd years, and scale, brand and value-creation are some of the crossroads for you now, keep reading.
Be the first to review “स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी”
You must be logged in to post a review.