खरी बुद्धिमत्ता भव्यदिव्यतेत तितकीशी नाही जितकी ती रोजच्या दिवसात आहे.
आयुष्यातील सर्वात मोठ्या आंतरिक ज्ञानाच्या जाणीवा साध्या-सोप्या गोष्टींतून का व कशा येतात याबद्दलची चर्चा सतीश मंडोरा ह्यांनी वडेवाला कर्मयोगी या पुस्तकात केली आहे. हे पुस्तक दैनंदिन कृतींमध्ये स्वतःचे साक्षात्कार शोधण्याबद्दल आहे.
जरी आयुष्याकडून असंय धडे शिकण्यासारखे असले तरी, जोपर्यंत आपण आपल्या आसमंताविषयी सजग नसतो आणि रोजच्या आयुष्याचे महत्त्व आपण जाणत नाही, तोवर आपले अँटेना चुकीच्या फीक्वेन्सीलाच जुळलेले राहतील. गरज आहे अधिक सखोलपणे, काळजीपूर्वक बघण्याची, मनाचा आवाज ऐकण्याची, उत्कटतेने अनुभव घेण्याची. सोपं वाटतंय, हो ना? पण दुर्दैवाने विस्मरणात गेलेली एक साधी गोष्ट अशी आहे, की साध्या-सोप्या गोष्टी आचरणात आणणं सर्वात कठीणअसतं.
हे पुस्तक तुमचा आयुष्यातील बहुतांश सामान्य घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. ज्या छोट्या बदलांनी मोठे परिणाम घडू शकतात, त्या बदलांविषयीचे वडेवाला कर्मयोगी हे पुस्तक आहे.
Be the first to review “वडेवाला कर्मयोगी”
You must be logged in to post a review.