गौळण : वाङमय आणि स्वरूप
गोकुळातील श्रीकृष्णाच्या लीला काव्यातून सांगणारा गौळण हा लोकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. लोकसाहित्यातील गौळणींचे दालन भक्तिभाव व शृंगाररसाने सजलेले आहे. संतांच्या गौळणींमध्ये गोपिकांचे श्रीकृष्णावरील प्रेमाचे आध्यात्मिक रूप दिसते, तर शाहिरांच्या गौळणींमध्ये लौकिक शृंगारभाव व्यक्त झाला आहे. ‘कशी जाऊ मी वृंदावना/ मुरली वाजवितो कान्हा’ (संत एकनाथ) अशा भक्ती व प्रेम या रसांनी ओथंबलेल्या गौळणी संतांनी लिहिल्या; तर ‘सोळा हजारात देखणी/ चांद दिसे जणू दर्पणी/ मीच एक राधा गवळ्याची/ आगे साजणी…(पठ्ठे बापूराव) अशा शृंगार व प्रेमरसांनी युक्त गौळणी शाहिरांनी लिहिल्या. दोन्ही प्रकार वाङ्मयात अमर ठरले आहेत, दोन्हींना रसिकमान्यता मिळाली आहे. भक्ती, प्रेम, अध्यात्म व शृंगार एकत्र गुंफणाऱ्या व पिढ्यानपिढ्या लोकमनावर राज्य करणाऱ्या या लोककलेवर संशोधन करून तिचे रसाळ रूप डॉ. रामचंद्र देखणे यांनी या पुस्तकातून समोर आणले आहे.
Be the first to review “गौळण”
You must be logged in to post a review.