आरोग्यसंपदा तनामनाची
जीवन जगत असताना प्रत्येकाला उपचारांची आवश्यकता कधी ना कधी जाणवतेच कित्येकदा तर आपल्या ठायी उपचारक दडला आहे, याची जाणीवच आपल्याला नसते. मात्र, अंतरंगामध्ये त्याचा शोध घेण्याची खरी आवश्यकता असते.
अशा वेळी स्वत:ला आणि भोवतालच्या सार्यांनाही उपचार देण्यासाठी आवश्यक अशा स्रोतांची परिपूर्ण माहिती विशद करणारे हे पुस्तक आहे.
या पुस्तकामध्ये तीन भागांच्या आधारे स्व-उपचारप्रक्रिया स्पष्ट होत जाते.
या 21 दिवसीय प्रक्रियांचे संपूर्ण विवेचन त्यातील बारकाव्यांसहित या पुस्तकामध्ये स्पष्ट करून सांगितले आहे.
दूर अंतरावरून तसेच आपल्या सान्निध्यात असणार्या व्यक्तीला उपचार देणे हाच या पुस्तकाचा गाभा आहे.
आपल्या दैनंदिन जीवनाचे प्रत्येक पान उत्सुकतेने उघडण्यासाठी उपचारांची ही अमूल्य भेट आपण स्वत:ला तसेच इतरांनाही नक्कीच द्यायला हवी.
Be the first to review “आरोग्यसंपदा तनामनाची”
You must be logged in to post a review.