असत्याची सत्यकथा

-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN:9789390869268
-Publication Year: 2021
-Author: Dr. Ashok Rana
-Product Code: VPG19219

240.00

असत्याची सत्यकथा

सत्यनारायण पूजेमागचे सत्य काय आहे? स्वर्ग-नरक, पाताळ खरेच आहेत का? स्वस्तिकचे मूळ काय? दैत्य-दानव, भूत-पिशाच यांचे वास्तव काय?

आजच्या विज्ञानयुगातही समाजात अनेक कालबाह्य समजुती, परंपरा रूढ आहेत. देव, धर्म, पुराणग्रंथांच्या नावावर  आजही त्यांचा  समाजावर पगडा आहे. असत्याला सत्याचा मुलामा देऊन समाजाची दिशाभूल करणारी वृत्ती आजही तेजीत आहे. या पुस्तकात लेखकाने सत्यशोधक नजरेने धारणा, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा यांमध्ये दडलेल्या असत्याचा साधार भांडाफोड केला आहे. त्यांनी वेद, पुराणे आदि धर्मग्रंथ, त्यांची अभ्यासक-संशोधकांनी केलेली वस्तुनिष्ठ चिकित्सा, पुरोगामी विचार यांचा आधार घेत समाजात रूढ झालेल्या समजुतींमागील बनवाबनवी, खोटेपणा  उघड केला आहे.

SKU: VPG19219
Categories:,
Brands
डॉ. अशोक राणा हे मराठीचे अध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचे ते पुरस्कर्ते आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवर त्यांची ७२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘साप्ताहिक चित्रलेखा’मध्ये गाजलेल्या ‘असत्याची सत्यकथा’ या लेखमालेतील लेखांचे हे पुस्तक आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “असत्याची सत्यकथा”