वाटा दुर्गभ्रमणाच्या – सातारा जिल्ह्यातील किल्ले

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455475
– Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Sandeep Tapkir
-Product Code: VPG18187

300.00

Compare

वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले

आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांची मोठी ऐतिहासिक परंपराच आढळते. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधले किल्ले ट्रेकर्ससहित सर्वांनाच खुणावत असतात. छत्रपती शाहू महाराजांची राजधानी असणार्‍या सातारा जिल्ह्यातही अनवट आणि प्रसिद्ध असे अनेक किल्ले आहेत. या पुस्तकामधून त्या किल्ल्यांचा इतिहास, त्या किल्ल्यांचे ‘विशेष’ असे वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे किल्ल्यांची सर्वंकष माहिती स्थलवर्णनासह लेखकाने वाचकांसमोर उलगडली आहे. प्रतापगड म्हटलं की शिवरायांनी केलेला अफजलखानाचा वध आठवतो, कमळगड म्हटलं की कावेची विहीर आठवते, वासोटा म्हटलं की ताई तेलिणीचा पराक्रम आठवतो, दातेगड म्हटलं की तलवारीच्या आकाराची विहीर आठवते, सज्जनगड म्हटलं की समर्थ रामदासस्वामी आठवतात, अजिंक्यतारा म्हटलं की महाराणी ताराबाई, शाहू महाराज आठवतात, वर्धनगड म्हटलं की वर्धनीमाता आठवते, संतोषगड म्हटलं की त्रिस्तरीय रचना आठवते, भूषणगड म्हटलं की हरणाई देवी आठवते, नांदगिरी ऊर्फ कल्याणगड म्हटलं की जलमंदिर आठवतं, सुभानमंगळ म्हणताच शिवरायांच्या आयुष्यातील पहिली लढाई आठवते. असं प्रत्येक किल्ल्याचं काही ना काही वैशिष्ट्य आपल्यासमोर येतं.

SKU: VPG18187
Categories:,
Brands
Brand:

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वाटा दुर्गभ्रमणाच्या – सातारा जिल्ह्यातील किल्ले”