Description
गिरिप्रेमी’ चा अष्टहजारी शिखरमोहिमांचा प्रवास २०१२मध्ये ‘एव्हरेस्ट’पासून सुरू होऊन २०२१मध्ये ‘माउंट अन्नपूर्णा मोहिमे’च्या यशस्वी संपन्नतेने निर्णायक टप्प्यावर येऊन थांबला. अत्यंत धोकादायक व अनिश्चित चढाई मार्ग, सतत बदलणारे लहरी हवामान व पदोपदी असलेला हिमप्रपातांचा धोका यांमुळे अन्नपूर्णा शिखरमोहीम इतर सर्व अष्टहजारी शिखरांच्या तुलनेत अवघड ठरते. म्हणूनच येथे असलेला मृत्युदर हा ३५% इतका जास्त आहे. या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांनी मोहीम यशस्वी केली. या रोमहर्षक चढाईची गोष्ट, अन्नपूर्णा शिखरमोहिमांचा रंजक इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत व लाघवी भाषेत डॉ. सुमित यांनी टिपला आहे. हे संपूर्ण अनुभवकथन तुम्हाला नक्कीच रोमांचित करेल, याची खात्री आहे. उमेश झिरपे (अन्नपूर्णा मोहीम नेता व छत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक)


![Pushpalata Krushighatak-पुष्पलता कृषीघटक [सुधारित दुसरी आवृत्ती ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230905-WA0002-1-180x280.jpg)

![The diary of a young Girl [द डायरी ऑफ यंग गर्ल ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2023/04/the_diary_of_a_young_girl_Cover_F-180x278.jpg)

Reviews
There are no reviews yet.