अलख निरंजन शिव गोरक्ष – नाथ संप्रदाय-आचार व तत्त्वज्ञान

– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424325
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Kishor (Uadyanath) Mandlik
-Product Code: VPG19263

170.00

अलख निरंजन शिव गोरक्ष’ नाथ संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान

  • नाथ संप्रदायाचे महत्त्व सहज सोप्या भाषेत उलगडून सांगणारे पुस्तक.
  • नाथ संप्रदाय हा गुरू-शिष्य परंपरेवर आधारित आहे. नऊ नाथांची माहिती देणारे पुस्तक.
  • नाथ संप्रदायाच्या खुणा महाराष्ट्रात जागोजागी आहेत. त्यांचे महत्त्व विशद करणारे पुस्तक.
  • धर्म, जात, लिंग अशा भेदभावांना थारा न देता सार्‍या समाजाला एकत्र आणण्याचे काम करणार्‍या नाथ संप्रदायातील सिद्ध गुरूंची ओळख करून देणारे पुस्तक.
  • मध्ययुगीन काळात अज्ञानामुळे व आचार-विचारातील भ्रष्टतेमुळे अधोगतीला लागलेल्या समाजाला ध्यान व योग साधनेच्या मार्गाने उन्नत करण्याचे कार्य केलेल्या नाथ संप्रदायाची समग्र माहिती सांगणारे पुस्तक
किशोर मंडलिक यांनी वयाच्या बाराव्या वर्षांपासून शालेय शिक्षणाबरोबरच आपले वडील तथा गुरू रामभाऊ मंडलिक म्हणजेच प. पू. गुरुवर्य श्री. नानामहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ संप्रदायाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ङी. नानामहाराज यांचा वनौषधींवरदेखील गाढा अभ्यास असल्याने लेखकानेदेखील जंगलातील औषधी वनस्पतींचे ज्ञान आत्मसात केले. पुढे काही वर्षे नाथ पंथाचा अभ्यास, सेवा, जप, तप, अनुष्ठाने केल्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षांपासून आपल्या वडिलांच्या सूचनेनुसार भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शनाचे कार्य सुरू केले. ते आजपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. लेखक हे गृहस्थाश्रमी नाथपंथी आहेत. त्यांच्या घराण्यात मागील पाच पिढ्यांचा नाथसेवेचा वारसा आहेत. 1991मध्ये, श्री. नानामहाराज यांनी श्री. शिवगोरक्ष आश्रम ट्रस्ट (मंदिर)ची स्थापना केली. ङी. नानामहाराज यांच्या समाधीनंतर ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने संपूर्ण कामकाज लेखक पाहतात. लेखक गेली अनेक वर्षे निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करत आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अलख निरंजन शिव गोरक्ष – नाथ संप्रदाय-आचार व तत्त्वज्ञान”