पोलीस फाइल्स

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424981
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Sushrut Kulkarni, Onkar kulkarni, Kedar wagh &  Ashlesha Gore
-Product Code: VPG19137

290.00

पोलीस फाइल्स

पुणे पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीवर आधारित कथांचे संकलन म्हणजे पोलीस फाइल्स. परदेशातील पोलीसकथा चित्तथरारक वाटतात; पण तुमच्या स्वत:च्या शहरातील पोलीसही कर्तबगारीत कुठेही कमी नाहीत. पुणे पोलिसांची कामगिरी वाचताना तुमचीही मान अभिमानाने ताठ होईल आणि ‘पोलीस आपला मित्र’ याची प्रचिती येईल. या पुस्तकातील कथा वाचल्यानंतर तुमच्या मनातील पोलीस कर्मचार्‍यांविषयी असलेली समजूत निश्चित बदलेल. तो (किंवा ती) सदैव कठोर नसतो, तो (किंवा ती) सदैव ‘चौकशी’च्या मन:स्थितीत नसतो, तो (किंवा ती) पोलीसठाण्यात हजर नसला, तरी तो (किंवा ती) सदैव ड्युटीवर असतो. गुन्हे घडू नयेत आणि माणूस गुन्हेगारीकडे वळू नये म्हणून पोलीस समुपदेशकाची भूमिकाही किती उत्तमरीत्या निभावतात, हेही आपल्याला वाचायला मिळेल. पोलीस सेवेबद्दल तरुण-तरुणींच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील आणि हुशार, सक्षम युक-युवतींना या क्षेत्राचे निश्चितच आकर्षण वाटेल.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पोलीस फाइल्स”